आदिती बानर्जी यांचं मनोगत

गांधारीचा शाप ह्या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना लेखिका आदिती बानर्जी म्हणतात कि एका लेखन कार्यशाळेमध्ये केलेल्या सर्जनशील लेखनामधील काही भाग संकलित करून ही कथा तयार करण्यात आली आहे.गांधारीने पति आंधळा असल्याने स्वत:चेही डोळे झाकून घेतले, त्यानंतर तिला कसं वाटलं असेल ते ह्या लेखांमधून मांडण्याच प्रयत्न केला आहे. गांधारीच्या गूढ आणि गुंतागुंतीच्या व्यक्तीमत्वाने मला भुरळ घातली.

श्रीकृष्णसुद्धा जिचा आदर करायचा अशी ती गुणी स्त्री होती. तिच्यातले गुण आणि संस्कार पाहिल्यावर तिच्याबद्दल लिहिलं पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटू लागलं.

गांधारी हे  महाभारतातलं असं पात्र आहे जे ना नायिकेचं आहे ना खलनायिकेचं. तिच्यामधील क्षमता लक्षणीय होत्या पण परिस्थितीमुळे तिला तिचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. पति आंधळा असल्यामुळे तिने स्वत:चेही डोळे बांधून घेणं ह्या तिच्या कृतीचा अर्थ समर्पण, आत्मघात किंवा बंडखोरी व्यक्त करणं ह्यापैकी काहीही असू शकतो. आजच्या काळातही ह्या व्यक्तिरेखेमध्ये स्त्रिया स्वत:ला पाहू शकतात.

Comments

Popular posts from this blog

Kitchen Tips

Merchant & four wives

What is MICR?